अहिल्यानगर

शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत ऊस पिक उत्पादनाकडे कल देण्याची गरज – राजेंद्र चेचरे

लोहगाव संस्थेची सभा संपन्न

राहुरी | बाळकृष्ण भोसले : सोयाबीन, कांदा, कपाशी या पिकाचे भाव शाश्वत राहिलेले नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी ऊस पिक घेण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन राहाता तालुक्यातील लोहगाव येथील वि. का. सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे यांनी केले.

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री चेचरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, स्व.पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, स्व. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमांना दिप प्रज्वलाने अभिवादन करण्यात आले. संस्थेचे सचिव आर व्ही चेचरे यांनी अहवाल वाचन केले. ॲड. बाबासाहेब चेचरे, माजी संचालक भाऊसाहेब चेचरे, माजी सरपंच गणेश चेचरे, सुरेश चेचरे यांनी संस्थेच्या प्रगतीपथाविषयी यथोचित मार्गदर्शन केले.

प्रसंगी राजेंद्र केरुनाथ चेचरे यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने यंदा २७०० रुपये भाव दिल्याबद्दल व पुढील वर्षी चांगला भाव देणार असल्याने त्यांचा अभिनंदन करण्याचा ठराव मांडला. त्याला उपस्थित सभासदांनी एकमताने सहमती दर्शवली. संस्थेच्या वॉल कंपाऊंडचे काम अतिशय सुंदर झालेले आहे. शौचालयाचे कामही पूर्ण करून घ्यावे अशी सूचना ॲड बाबासाहेब चेचरे यांनी यावेळी मांडली.

संस्थेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी पीक कर्जाच्या पलीकडे जाऊन सोसायटीच्या जागेवर पर्यायी उद्योग उभारण्यात यावा, त्याचप्रमाणे मॉल किंवा पेट्रोल पंपासारखा मोठा व्यवसाय चालू करावा जेणेकरून संस्थेच्या उत्पन्नात वाढ होईल व त्याचा फायदा सभासदांनाही होईल अशी सूचना माजी संचालक भाऊसाहेब चेचरे यांनी यावेळी मांडली.

संस्थेच्या प्रत्येक सभासदाचा दरवर्षी विमा उतरण्यात यावा अशी सूचना माजी संचालक भाऊसाहेब चेचरे यांनी मांडली. त्यास माजी सरपंच गणेश चेचरे यांनी अनुमोदन दिले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या प्रवरानगर शाखेचे शाखाप्रमुख पदी सौ अपेक्षा मनोज कडू यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सदस्य विजय हरिभाऊ चेचरे, माजी कामगार पोलीस पाटील वसंतराव चेचरे, प्रभाकर चेचरे, दत्तात्रय हौशिराम चेचरे, अशोक रावसाहेब चेचरे, अशोक सुखदेव चेचरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शांताराम चेचरे, उपाध्यक्ष भाऊसाहेब विश्राम चेचरे, भास्करराव चेचरे, विजय बबनराव चेचरे, शुभम बाबासाहेब चेचरे, लक्ष्मण चेचरे, किरण चेचरे, विठ्ठल दरंदले, प्रवीण चेचरे, गोरक्षनाथ गोपाळे, किशोर दरंदले, पत्रकार कोडीराम नेहे, विजय दरंदले, धुळाजी चेचरे, रवींद्र चेचरे, कृष्णा चेचरे, बळीराम चेचरे, विनायक दरंदले, अमोल चेचरे, लक्ष्मण चेचरे, अनिल चेचरे, अण्णासाहेब चेचरे, सौ अनिता तुरकणे, सौ पुष्पलता चेचरे, अण्णासाहेब दामोदर चेचरे, रावसाहेब मच्छिंद्र चेचरे, अक्षय चेचरे सह मान्यवर सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. किरण चेचरे केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button