पवित्र ख्रिस्त शरीराचे जगातील चमत्कार दर्शक प्रदर्शनात सहभागी व्हा-पाटोळे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगाव येथील संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने दि २६ व २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ४ वा. पर्यंत ब्रेड ऑफ लाईफ फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्हेटीकन प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी प्रदर्शनाचा शुभारंभ हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक, सचिन, रिचर्ड यांच्या हस्ते सकाळी ९ वा. झाला. त्यावेळी संस्थापक जोसेफ पाटोळे यांनी प्रतिपादन केले की, मतमाउली यात्रेचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अतिपवित्र साक्रामेंताचे चमत्कार जे जागतिक स्तरावर घडलेले आहेत, त्याचे प्रदर्शन चर्चमध्ये घेतले आहे. जे विश्वासू आहेत व जे साक्रामेंताचा स्वीकार करतात अशांनी दोन दिवसाच्या प्रदर्शनात सहभागी व्हावे.
जगप्रसिद्ध लासियानो चमत्कार ७५० इ.स. चिरत्तकोनम भारतातील ख्रिस्त शरीर चमत्कार, ऐतिहासिक सचित्र प्रतिनिधीत्वाने ख्रिस्तशरीर चमत्काराची मान्यता, २५ हून अधिक चर्च मान्यता प्राप्त, विश्वास श्रद्धा बळकट करावी. तज्ञाकडून पोवरपौइन्ट सादरीकरण केले. या प्रदर्शनात पुस्तके, डीव्हीडी, धार्मिक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.
यावेळी सचित्र व एलसीडी व्दारे पवित्र ख्रिस्त शरीराचे जगातील चमत्कार याची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी, भाविक यांनी घेतला. यावेळी हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक रोझारिओ रिचर्ड, सचिन, ज्यो दिवे, सुभाष पंडित तसेच ब्रेड ऑफ लाईफ फौंडेशन अहमदनगर अध्यक्ष जोसेफ पाटोळे व सर्व सहकारी उपस्थित होते.