वडाळा बहिरोबा येथे कृषीदुतांकडून वृक्षारोपण
नेवासा : तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे कृषि महाविद्यालय भानसहिवरे येथील बीएससी ॲग्रीच्या चौथ्या वर्षातील कृषिदुतांनी ‘रावे’ ( ग्रामीण कृषि कार्यानुभव ) उपक्रमातंर्गत मंगळवारी स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश मोटे तर सरपंच ललित मोटे, उपसरपंच सचिन मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषिदुत प्रविण बोरुडे याने कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून वृक्षरोपणाचे महत्व सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसागर दोडोके, वैभव चापे यांनी केले तर आभार प्रथमेश जामकर, प्रज्वल काकडे आणि अनिकेत चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कृषिदुतांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक उबाळे सर यांच्यासह शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण कृषि कायानुभव अंतर्गत या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य पी. ए तूर्भटमट, कार्यक्रम समन्वयक एम.आर. माने, प्रा. यु.वी महाजन, प्राध्यापिका जे.बी खकाळे, प्रा. सागर साबळे, प्रा. सागर सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले.