महिपती महाराज देवस्थान पायी दिंडीचे राहुरी शहरात स्वागत
राहुरी – दि. 16 जुन 2023 रोजी महिपती महाराज देवस्थान, ताहराबाद दिंडीचे राहुरी शहरात आगमन होताच नांदूर रोड शिव चिदंबर मंगल कार्यालय येथे राहुरी शहर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहर प्रमुख गंगाधर सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलाच्या पालखीचे पूजन करून दिंडी सोहळ्याचे विश्वस्त आणि महाराज यांचा सत्कार केला.
दिंडीतील वारकर्यांना राहुरी शहर शिवसेनेच्या वतीने चहा, पाणी आणि अल्पोहार म्हणून केळी देण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी कोल्हार येथील ज्येष्ठ शिवसैनिक शामभाऊ गोसावी आणि राजेंद्र लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोरक्षनाथ सिन्नरकर, सुयश सुबधं, बाळासाहेब येवले, ढोकणे मेजर, बाळासाहेब लगे, विशाल मकासरे, विकास काशीद, संतोष सरोदे, आदित्य गिरगुणे, जगन्नाथ गुलदगड, जाधव सर, बाळासाहेब पवार, राजेंद्र खांडवे, संतोष खाडे, राजू भागवत, दिग्विजय गिरगुणे, शरद गावडे, किशोर गावडे, सूर्यकांत डावखर आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.