राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा संपन्न
छत्रपती चौक स्मारकाचे जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
राहुरी | अशोक मंडलिक – आज राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले होते.
या प्रसंगी मराठा संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा राहुरी मध्ये साजरा करण्याचे हे चौथे वर्षं आहे. कोरोना काळात रायगड येथे राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घातले होते. त्यामुळे छत्रपती शिव-शंभू प्रेमी व्यथित झाले होते. राज्याभिषेक सोहळ्यात खंड पडू नये म्हणून राहुरी येथे छत्रपती चौक येथे राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
छत्रपतींचे नाव या परिसराला देण्यासाठी मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांना मोठा संघर्ष करावा लागला. आज या चौकाचे छत्रपती चौक असा नामफलक व स्मारकाचा लोकार्पण सोहळा हा जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते संपन्न करण्यात आला. राहुरी येथिल राज्याभिषेक सोहळ्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित असणारे स्वराज्य घडविण्यासाठी राहुरी तालुक्यात ३०० शिवदुतांची नेमणूक करण्यात आलेली आहे. शासन दरबारी कामे करण्यासाठी कोणी हलगर्जी पणा करत असेल किंवा शासनाने ठरवून दिलेल्या देयका व्यतिरिक्त कोणी आर्थिक लुट करत असल्यास अथवा कोणत्याही क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांना अडचण निर्माण झाल्यास शिवदूतांना संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. अडचणीत असणाऱ्या जनतेसाठी “अडचण जिथे शिवदूत तिथे” हे ब्रीद वाक्य ठरत आहे असे लांबे म्हणाले.
यावेळी वळण येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक मंगेश पगारे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन करून सर्वप्रथम लोकशाही आणली. मराठा एकीकरण समिती नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. भविष्य काळात येणाऱ्या पिढ्यांना आपला इतिहास माहित असणे गरजेचे आहे. कारण ज्याला आपला इतिहास माहित नाही तो त्याचा भविष्यकाळ घडवू शकत नाही. हेच काम मराठा एकीकरण समितीच्या माध्यमातून केले जात आहे. या राज्याभिषेक सोहळ्या प्रसंगी जिजाऊंच्या लेकी यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. सनई चौघड्यांच्या वादनाने छत्रपती चौक परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी वर्षा लांबे, संगीता दरंदले, मंगल थोरात, दिपाली पोपळघट, विद्या अरगडे, जाणका लबडे, राजश्री घाडगे, ज्योती नालकर, राजश्री म्हसे, वैशाली शेळके, अनिता तुपे, पल्लवी वामन, पूनम शेंडे, प्रतिभा घाडगे, अपेक्षा वाघमारे, कविता नरवडे, साहेबराव म्हसे, ज्ञानदेव नालकर, सागर ताकटे, अविनाश क्षीरसागर, महेंद्र शेळके, राजेंद्र लबडे, संदीप गाडे, रोहित नालकर, मिलिंद डावखर, टाकळीमिया गावचे उपसरपंच किशोर मोरे, प्रवीण गाडे, अशोक तनपुरे, गणेश पोपळघट, निखील कोहकडे, रविंद्र कदम, महेंद्र उगले, अशोक तुपे, अनिल आढाव, कुलदीप नवले, विकास गरड, दत्तात्रय अडसुरे, मधुकर घाडगे, राजू घनवट, संजय पोपळघट, विनायक बाठे, अमोल पवार, सुभाष पवार, अमोल वराळे, योगेश निकम, सचिन घाडगे, मेजर वांढेकर नामदेव, संदीप डावखर, अमोल म्हसे, गौरव जाधव, दाने मामा, संजय देवरे, ज्ञानेश्वर सप्रे, संदीप कवाने आदी शिवप्रेमींची उपस्थिती होती.