महाराष्ट्राचे लोककवी प्रशांत मोरे रविवारी चिंचोलीत
राहुरी : जाई प्रतिष्ठानच्या वतीने आई वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त चिंचोली येथे रविवार, दि. २१ मे रोजी सकाळी ९:३० वा. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि साहित्यिक पुरस्कार वितरण समारंभ आमदार लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, उद्योजक दिलीप जगताप, साहित्यिक भास्कर निर्मळ, लोकसत्ता संघर्ष चे संपादक प्रकाश साळवे, कवि शशिकांत शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात गावातील १३८ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार असून आठवणींचा डोह – सुनील गोसावी, श्री जाणवेच्या कविता- चंद्रकला आरगडे, मोहोर उजेड वाटांवर – चंद्रकांत पालवे यांच्या पुस्तकांना तर ज्येष्ठ पत्रकार प्रभंजन कमिंगध्वज यांना पत्रकारितेतल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमास परिसरातील साहित्यिक, कवी व साहित्याची आवड असलेल्या रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य चंद्रकांत भोसले, संयोजक पत्रकार बाळकृष्ण भोसले यांनी केले आहे.