वंचित कडून उल्लेखनीय व कौतुकास्पद जयंती साजरी – पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे

राहुरी | अशोक मंडलिक : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना वही, पेन, चप्पल असे उपयोगी साहित्य व वस्तूंचे वाटप करण्यात आल्याने आजची ही जयंती उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी केले.
राहुरी शहरातील कन्या विद्यालय येथे दि. १५ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या विद्यमाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार फसियोद्दिन शेख, वंचितचे जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, पिंटूनाना साळवे, मधुकर घाडगे, मुख्याध्यापक विष्णू कांबळे, पत्रकार मनोज साळवे, अनिल कोळसे, संजय संसारे, विनित धसाळ, गोविंद फुणगे, पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना तहसीलदार फसियोद्दिन शेख म्हणाले की, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महान आहे. त्यांनी समाज कार्यासाठी आपले आयुष्य झिजवले. त्यांना अपेक्षित अशी व समाजाला प्रेरित करणारी भिम जयंती आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साजरी करण्यात आली, असे सांगून तहसीलदार शेख यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रारंभी उपस्थित मान्यवरांकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण पुजन करण्यात आले. त्यानंतर दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. वंचितचे निलेश जगधने व पिंटूनाना साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वही, पेन, चप्पल व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हसू दिसून आले.
या प्रसंगी कांतिलाल जगधने, नंदु शिंदे, ज्ञानेश्वर जगधने, छाया दुशिंग, आयनोर पठाण, साईनाथ बर्डे, आकाश दिवे, मनीष शिंगाडे, आशुतोष केदारी, किशोर पातोरे, राजेंद्र जगधने, मयूर दुधाडे, प्रफुल लांहुडे, सुनील शिंगाडे, सनी साळवे, रघुनाथ जाधव, किरण आव्हाड, यश दुशिंग, अनिल चांदणे आदींसह विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.