अहिल्यानगर
अप्पर जिल्हाधिकारी पदावर याच जिल्ह्यात पुन्हा यावे – मुदगुले

श्रीरामपूर : येथील लोकप्रिय व सर्वांच्या मनात बसलेले प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांची बदली झाल्याने दोन्ही पदाधिकार्यांनी या जिल्ह्यात बढती घेऊन पुन्हा विराजमान व्हावे, अशी अपेक्षा जिव्हाळ्याच्या व आपुलकीच्या शुभेच्छा खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेशराव मुदगुले व सहकारी पदाधिकारी यांनी दिल्या.
प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या निरोप प्रसंगी सत्कार गणेशराव मुदगुले व भाऊसाहेब बांद्रे यांनी केला. त्यावेळी माजी सभापती दिपकराव पटारे, पोपटराव जाधव, शरदराव नवले, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, नितीन भागडे, पप्पू पटारे आदींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.