अहिल्यानगर

सात संस्कार आचरणाने जीवनात प्रभू येशूचा प्रकाश येईल- फा. संसारे

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : हरिगाव मतमाउली यात्रा शुभारंभ १ सप्टे रोजी झाल्यावर २ रे नोव्हेना पुष्प प्रमुख अतिथी रे फा.भाऊसाहेब संसारे एस जे पुणे यांनी गुंफले.“ सात संस्काराची ओळख या विषयावर प्रवचनप्रसंगी ते म्हणाले की आज आपण पवित्र मातेच्या नोव्हेनाचा दिवस साजरा करीत आहोत.आणि आजचा आपला विषय अतिशय सुंदर आहे.“प्रभू येशूचे सात संस्कार”आणि या सात संस्काराची ओळख करून देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.

परमेश्वराने त्याचे सात संस्कार आपल्याला दिलेत परंतु हे सात संस्कार लोकांपर्यंत पोहोचावे आपल्या मानवी जीवनात रुजवावे म्हणून ख्रिस्त सभेने आपल्याला प्रार्थना दिलेल्या आहेत.त्याच बरोबर आपण ह्या पाच प्रार्थना जर जीवनात आत्मसात केल्या तर आपल्या जीवनात हे सात संस्कार बरोबर येणार आणि आपले जीवन संस्कारमय बनणार म्हणून ख्रिस्त सभेने दिलेली शिकवण आणि त्याचा पाठपुरावा करणे त्याचे आचरणात आणणे हे आपले कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला या सात संस्काराची ओळख पाहिजे असेल तर कुटुंब सुद्धा फार महत्वाचे आहे.

आई वडील, आपले भाऊ बहिणी असतील, इतर नातेवाईक असतील, आजी आजोबा असतील, या सर्वांचा सहभाग खूप आहे, नाहीतर आपल्याकडे संस्कार भरपूर आहेत पण संस्कार आचरणात आणणारे खूप कमी आहेत. म्हणून जर आई वडिलांनी आणि विशेष करून आई जर आपली संस्कारी असेल तर अतिशय चांगले कारण सर्व कुटुंब संस्कारमय बनेल. त्याच बरोबर या संस्कारांची ओळख करून देण्यासाठी समाजाची नितांत गरज आहे. कारण समाजामध्ये ज्या संस्कृती आहेत. जी आपली संस्कृती असते त्या संस्कृतीव्दारेसुद्धा आपण समाजाला आपल्या संस्काराची ओळख करून देतो आणि संस्कृती आणि संस्कार यांची जर सांगड बसली तर जीवन अतिशय फुलून येते. सगळ्यांचे जीवन सुखकर होते आणि शेवटी संस्काराची ओळख करून देण्यासाठी मित्र परिवाराची खूप गरज आहे. जीवनात अनेक मित्र आहेत आपल्याला, आपले सवंगडी आहेत सोबती आहेत आणि या सवंगडी व सोबत्यांचे त्यांचे जीवन जर संस्कारमय नसेल तर आपल्या जीवनात खूप अडचणी येऊ शकतात म्हणून आपल्या सर्वांची अगदी पवित्र शास्त्रमाव्दारे परमेश्वराने ओळख करून दिली.

ख्रिस्त सभेचे सर्व सभासद, धर्मगुरू, धर्मभगिनी, त्याच बरोबर कुटुंब आणि समाज आणि आपला मित्र परिवार आपण सर्वच जर मिळून जर हे संस्कार आचरणात आणले तर आपल्या जीवनात खरच प्रभू येशूचा प्रकाश येईल व हा प्रकाश एव्हढा सुंदर असेल आणि या प्रकाशामध्ये आपल्याला सर्व विश्व नव्याने दिसेल व हा प्रकाश सर्व जगाला व्यापून टाकेल. कारण प्रभूची शक्ती, प्रभूची दया, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असते म्हणून हे संस्कारमय जीवन जगणे म्हणजे प्रभूची द्या आपल्यामध्ये आत्मसात कर आदी मौलिक मागदर्शन केले. आजच्या या नोव्हेनाप्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, फा मायकल वाघमारे, टिळकनगर, डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, संजय पठारे सहभागी होते. ३ सप्टेंबर रोजी स्नानसंस्कार या विषयावर फा. अमृत फोन्सेका यांचे प्रवचन होणार आहे. हे सर्व कार्यक्रम यु ट्यूब प्रसारमाध्यमाव्दारेमतमाउली भक्तिस्थान” यावर प्रसारित करण्यात येत आहे. दर्शन व त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button