ठळक बातम्या
राहुरी पंचायत समिती खेळते नागरिकांच्या आरोग्याशी – शिवसेना तालुका प्रमुख लांबे
राहुरी – पंचायत समिती, राहुरी येथे शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे हे काही कामानिमित्त गेले होते. त्यांना तहान लागल्याने पंचायत समितीने पाणी पिण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसून आले.
श्री.देवेंद्र लांबे यांना त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी अत्याधुनिक मशनरी बसविलेली दिसली. ते मशीन बंद स्वरुपात असल्याचे निदर्शनात आल्यानंतर पाणी साठवण्यासाठी जे मशीन आहे ते उघडून पहिले असता मोठ्या प्रमाणावर घाण त्या मशीन मध्ये दिसून आली. पाणी साठवण करण्यासाठी जे मशीन बसविण्यात आले, त्या वरील आवरण देखील तुटलेल्या अवस्थेत होते. त्या आवरणातून विषारी किडे, अथवा जीव त्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना हे मशीन केवळ लोकांना दाखविण्यासाठी भिंतीवर बसविले काय? असा प्रश्न पडल्याने शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी सदर परिस्थिती प्रभारी गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांच्या निदर्शनास आणून दिली.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा : राहुरी पंचायत समिती खेळते नागरिकांच्या आरोग्याशी – शिवसेना तालुका प्रमुख लांबे
त्यावर पाटेकर म्हणाले कि, मी प्रभारी म्हणून राहुरी पंचायत समिती येथे आलेलो आहे. सध्या राहुरी येथे बाळासाहेब ढवळे हे काम पाहतात. येथील अधिकार्यांनी केवळ उडवाउडवीचे उत्तर दिले. राहुरी पंचायत समिती पूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच यांना ग्रामसमृद्धीचे उपदेश पाजले जाते परंतु यांच्याच कार्यालयात ढिसाळ कारभार चालतो हे दिसून येत आहे. राहुरी पंचायत समितीच्या या ढिसाळ कारभाराविषयी मोठ्या प्रमाणावर जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
यावेळी लांबे यांनी राहुरी पंचायत समितीच्या ढिसाळ कारभाराची चौकशी करून सबंधित गटविकास अधिकारी ढवळे व प्रभारी गटविकास अधिकारी पाटेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी शिवसेनेचे तालुका संघटक अशोक तनपुरे, शेतकरी आघाडीचे तालुका प्रमुख किशोर मोरे उपस्थित होते.