अहिल्यानगर
तालुका विकास अधिकारी तनपुरे व विशेष वसुली अधिकारी मंडलिक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस कडुन सत्कार
राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य असणार्या अहमदनगर जिल्हा ए डी सी सी बँक स्टाफ सोसायटीच्या निवडणूकीत राहुरी तालुक्यात तालुका विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. मच्छिंद्र तनपुरे यांची संचालकपदी बिनविरोध व विशेष वसुली अधिकारी श्री. मंडलिक यांची तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव गागरे पाटील यांच्या हस्ते सहकारमहर्षी डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृृह येथे करण्यात आला.
त्याप्रसंगी टि डि ओ कार्यालयाचे अधिक्षक सर्वश्री दुधाट, टि डि ओ कार्यालयाचे इन्स्पेक्टर राऊत, राहुरी टाऊन इन्स्पेक्टर पागिरे, म्हैसगावचे बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष गोकुळ कदम, सर्व टि डि ओ ऑफिसचे सेवक व कर्मचारीवृंद तसेच राहुरी टाऊन शाखेतील शाखा अधिकारी व सर्व स्टाफ उपस्थितीत होता.