राजकीय

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्क प्रमुखपदी पै. खेवरे

राहुरी | अशोक मंडलिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्क प्रमुखपदी पै. रावसाहेब खेवरे यांची निवड करण्यात आली असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
पै. रावसाहेब खेवरे हे उत्तर नगर जिल्हा शिवसेना प्रमुख म्हणून काम पाहत होते. त्यांच्या या प्रमुख पदावरून त्यांनी उत्तर भागात मोठा संपर्क उभा करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या वतीने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोठे सहकार्य केले होते. गावोगावी शाखा स्थापन करत शिवसैनिकांची मोठी फळी उभी केली आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्यांचे काम पाहून त्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देऊन मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे.
यावेळी पै. खेवरे म्हणाले की, पक्षप्रमुखांनी टाकलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावून संघटनेसाठी चांगले काम करून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त संघटन करू, आपल्या सहसंपर्क प्रमुख पदाचा पक्षाला कसा फायदा होईल, यासाठी रात्रंदिवस काम करणार असल्याचे पै खेवरे सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Back to top button