आरोग्य
उद्या उंदीरगाव येथे महाआरोग्य शिबीर
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : उद्या दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 ते 5.00 या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र उंदिरगाव येथे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने संकल्प निरोगी महाराष्ट्राचा या उद्देशाने मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गरजु रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा.आ.केंद्र उंदिरगावचे वैद्यकीय अधिकारी सुनील राजगुरू यांनी केले आहे.