अहिल्यानगर
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहर सरचिटणीसपदी म्हस्के
श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : श्रीरामपूर शहरातील आशीर्वादनगर येथील सुनील बाबुराव म्हस्के यांची श्रीरामपूर शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे श्रीरामपूर शहराध्यक्ष सोहेल शेख यांनी ही नियुक्ती केली व नियुक्तीचे पत्र श्रीरामपूर नगराध्यक्षा व साई संस्थान शिर्डी विश्वस्त अनुराधा आदिक यांच्या हस्ते देण्यात आले.
म्हस्के हे अविनाश आदिक यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षाचे कार्य सतत करीत असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे पुरोगामी विचार व पक्षाची ध्येयधोरणे समाजात रुजवून पक्ष बळकटीचे काम, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम जबाबदारीने पार पाडू असे आश्वासन सुनील म्हस्के यांनी दिले.
यावेळी नगरसेवक प्रकाश ढोकणे, तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, रईस जहागीरदार, अल्तमश पटेल, रोहित शिंदे, सोमनाथ गांगड, जयश्री जगताप, नजीर मुलांनी, सागर कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.