ठळक बातम्या
कनगर ग्रामपंचायत करणार थकबाकी नसलेल्या कुटुंबातील महिलांच्या हस्ते झेंडावंदन
राहुरी | अशोक मंडलिक : तालुक्यातील कनगर गावचे आदर्श सरपंच सर्जेराव गोरक्षनाथ घाडगे यांच्या संकल्पनेतून जे नळ कनेक्शन धारक माहे मार्च २०२३ अखेर पाणीपट्टी व घरपट्टी जमा करतील, त्यांच्या कुटुंबातील महिलांच्या हस्ते २६ जानेवारी २०२३ रोजी झेंडावंदन करून साडी चोळीचा मान देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या संकल्पनेतून आज ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ज्यांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरली अशा नळ कनेक्शन धारकांचा लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये भगवान विठ्ठल नालकर यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांच्या पत्नी सौ. सरस्वती भगवान नालकर यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२३ रोजी झेंडावंदन करून साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.