अहिल्यानगर
कोंढवड येथील उमेद अभियानाच्या महिलांनी मानले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आभार
राहुरी | बाळकृष्ण भोसले : कोंढवड येथील महिला स्वयंसहाय्यता समुहांना कर्ज वितरण करण्यात आल्याने उमेद अभियानाच्या महिलांनी तसेच क्रांतीसेनेच्या पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी कोंढवड येथील महिला स्वयंसहाय्यता समुहांना कर्ज पुरवठा करण्यास बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे उमेद अभियानाच्या महिलांनी क्रांतीसेनेकडे तक्रार केली. त्यानुषंगाने क्रांतीसेनेकडुन मा. मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्यांकडे निवेदन देत अभियानाचा मुळ उद्देश साध्य होत नसेल तर अभियान बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संबंधित विभागाला सुचना दिल्याने मंत्रालयातुन अभियानाचे अधिकारी श्री. विष्णू राठोड यांनी फोन करून महिलांच्या अडचणी समजावून घेतल्या व त्याप्रमाणे संबंधित विभागाला सुचना देऊन लवकरात लवकर अडचणी सोडवण्यास सांगितल्या. संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन उमेद अभियानाच्या महिलांचा प्रश्न मार्गी लावला.
उमेद अभियानाच्या महिलांना कर्ज पुरवठा करण्यात आल्याने मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, श्री. विष्णू राठोड, तालुका अभियानाचे प्रविण गायकवाड, प्रजापती मॅडम, पगारे मॅडम आदींचे क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, सचिन म्हसे, महिला तालुकाध्यक्ष भारतीताई म्हसे, कोंढवड सीआरपी राधिका म्हसे, राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा वैशाली म्हसे, सचिव मंगल म्हसे, कोषाध्यक्ष भारती पवार, लिपिका उमा म्हसे, कमल म्हसे, मंगल म्हसे, सरिता म्हसे, लता म्हसे, रोहीणी म्हसे, मंदा पेरणे, प्रतिभा औटी, स्वाती औटी, रूपाली म्हसे, शांता म्हसे आदींनी आभार व्यक्त केले आहे.