राजकीय

बाळासाहेबांची शिवसेना राहुरी तालुका प्रमुखपदी देवेंद्र लांबे पाटील

राहुरी : गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणारे देवेंद्र लांबे पाटील यांनी खा.सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते शिर्डी लोकसभा जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर, कमलाकर कोते, दक्षिण जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्ष प्रवेश केला.
बाळासाहेबांची शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देवेंद्र लांबे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत खा सदाशिवराव लोखंडे यांनी देवेंद्र लांबे यांची राहुरी तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहुरी तालुका प्रमुख होण्यासाठी अनेकांनी जोर लावलेला होता. राहुरी तालुक्यासह देवेंद्र लांबे यांचे उत्तर नगर जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा तसेच सामाजिक संघटनेत जिल्हा पदाधिकारी म्हणून काम पहिले आहे. लांबे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना प्रवेशाने खा.सदशिव लोखंडे यांना मोठी मदत मिळणार आहे असे बोलले जात आहे. सामाजिक संघटनेत लांबे यांनी सर्वसामन्य लोकांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने केलेली आहेत.सामाजिक चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. येत्या काळात बाळासाहेबांच्या शिवसेना प्रवेशाने राहुरी तालुक्यात पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे. युवकांचे मोठ संघटन त्यांच्या सोबत असल्यामुळे तालुक्यातील राजकारणात कोणाला फायदा तर कोणाला तोटा याची गणिते आखली जाणार आहेत.
देवेंद्र लांबे याच्या निवडी बद्दल ना.शंभूराज देसाई, आ.शहाजी बाप्पू पाटील, राज्य प्रवक्ते संजीव भोर, राजेंद्रभाऊ शेटे, वारकरी संप्रदायचे जिल्हाप्रमुख संपतराव जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, जि. युवा सेनाप्रमुख शुभम वाघ, जि.म.आ.प्रमुख कावेरीताई नवले, वैद्यकीय कक्ष जितेंद्र जाधव यांनी अभिनंदन केले आहे. देवेंद्र लांबे यांची तालुका प्रमुख पदी निवड व्हावी म्हणून जयंत पवार, संभाजी पेरणे, अशोक तनपुरे, विक्रम गाढे, विनायक बाठे, ज्ञानेश्वर टेकाळे, संभाजी निमसे, सुनिल कराळे (राहुरी ३२ गाव प्रमुख), बाप्पू शेरकर(श्रीरामपूर ता.प्रमुख) यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button