अहिल्यानगर

शालेय विद्यार्थ्यांनी स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवावा- सरपंच गवारे

खा. आदिक शिक्षण संस्था अंतर्गत वकृत्व स्पर्धा व जलकुंभ भूमिपूजन
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शाळेमध्ये उत्साही वातावरणात खेळांना, विविध स्पर्धांना चालना प्रेरणा मिळते. कष्ट केल्याशिवाय सराव व मेहनत प्रत्येकाला करण्याची आवश्यकता आहे. खेळासमवेत इतर स्पर्धेतही विद्यार्थ्याने आपण राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविण्याचा प्रयत्न करावा. आम्ही पण या शाळेचे विद्यार्थी असताना १९९६ पासून क्रीडा स्पर्धा झाल्या. त्यावेळी पहिल्यांदाच ५ स्पर्धा झाल्या. त्यावेळी शाळेला विजय मिळवून दिल्या. त्यासाठी क्रीडा शिक्षक भास्करराव ताके यांचेही मोठे योगदान आहे, आदी प्रतिपादन शिरसगाव सरपंच आबासाहेब गवारे यांनी खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वकृत्व स्पर्धा शुभारंभ व माजी क्रीडाशिक्षक भास्करराव ताके यांनी सेवानिवृत्तीच्या वेळी मनोदय केल्याप्रमाणे शिरसगाव विद्यालयास विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाण्यासाठी आई स्व.इंद्रायणी यांचे स्मरणार्थ जलकुंभ उभारण्याचे काम सुरु झाले याचे भूमिपूजन प्रसंगी केले.
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते सरस्वती व स्व.आदिक यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या शुभारंभास चेअरमन किशोर पाटील, साईनाथ गवारे, राजेंद्र गवारे, संस्था सहसचिव जयंतराव चौधरी, जन.कौन्सिल सदस्य हंसराज आदिक, सुनील थोरात, प्राचार्या सुमती औताडे, मुरलीधर यादव, जयश्री उंडे, सोमाजी नाटके, हर्शल दांगट, भास्करराव ताके, पर्यवेक्षक विजय थोरात व परीक्षक, तसेच विविध शाळेचे मुख्याध्यापक, स्पर्धक, शिक्षक, उपस्थित होते. यावेळी सहसचिव जयंतराव चौधरी, किशोर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले व स्व.खा.गोविंदराव आदिक यांच्या कार्याची माहिती दिली. पिण्याचे पाणी म्हणजे ताके सरानी पुण्याचे काम केल्याचे सांगितले.
वकृत्व स्पर्धा शुभारंभप्रसंगी पूनम जाधव हिने बळीराजा, शेतकरी आत्महत्या या विषयावर मौलिक भाषण केले. प्रास्तविक प्राचार्या सुमती औताडे यांनी केले व शाळा प्रगतीपथावर असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व आढावा सांगितला. किशोर पाटील यांनी सुद्धा येत्या काळात निश्चित योगदान दिले जाईल असे आश्वासन दिले. सूत्र संचालन श्रीमती गजभिव व आभार प्रदर्शन गणेश पंडित यांनी केले.

Related Articles

Back to top button