अहिल्यानगर
संगमनेर येथे जिल्हास्तरीय दिव्यांग शाळा समुहनृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
श्रीरामपूर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग अहमदनगरच्या व संग्राम मूकबधिर विद्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कवी अनंत फंदी नाट्यगृह संगमनेर या ठिकाणी जिल्हास्तरीय दिव्यांग शाळा समुहनृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील एकुण 26 संघांनी सहभाग नोंदविला होता.
जिल्हास्तरावरील स्पर्धेत श्रीरामपूर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हलगी वाजते या गीतांवर अप्रतिम नृत्य सादर करून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. सदर नृत्याची संकल्पना व दिग्दर्शन विद्यालयाचे वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांची होती. वेषभूषा कलाशिक्षक चंद्रकांत सांगळे व विशेष शिक्षिका सौ. कौशल्या जाधव, रंगभूषा कलाशिक्षक दिपक तरकासे यांची होती. याकामी वाचाउपचारतज्ञ मंगेश सालपे, भाषा शिक्षक रामदास रासकर, सौ.कांता तावरे, मधुकर पवार, शेकटकर, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले.
समुहनृत्य मध्ये कु. वैष्णवी सिनारे, अलशिफा शेख, रामेश्वरी घनवट, कल्याणी घनवट, आदिती सुर्यवंशी, आलिझा मिझा, शुभांगी थोरात, समृध्दी मोरे, साई शेलार, ओम माळी, प्रथमेश ढगे या विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग नोंदविला. सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन प्रसंगी संगमनेर नगरपरिषद माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवडे, सहायक लेखाधिकारी गांगुर्डे, सहाय्यक सल्लागार दिनकर नाठे, दिव्यांग शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना अहमदनगर जिल्हाध्यक्ष संजय साळवे, उपाध्यक्ष नारायण डुकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजेत्या संघाचे रोटरी एज्युकेशन ट्रस्ट चेअरमन सुरेश पाटील बनकर, गुजराथी समाज ट्रस्ट चेअरमन नारायणभाई पटेल, रोटरी क्लबचे अध्यक्ष ऋषिकेश बनकर, सचिव अभिजीत मुळे, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, उपाध्यक्ष सुनिल कानडे यांनी विशेष अभिनंदन केले.