अहिल्यानगर
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या निवृत्ती वेतनधारकांना दिलासा
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्त वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुचित करण्यात येत आहे की, माहे १ नोव्हेंबर रोजी हयात असल्याचा दाखला सुलभरीत्या सादर करणे कामी चालू वर्षी हयात प्रमाणपत्र नोंदविणे कामे बँकेस निवृत्ती वेतनधारकांची यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातून सुमारे ५००० निवृत्ती वेतनधारक विविध जिल्ह्यातून निवृत्ती वेतनाचा लाभ घेत असून त्यांना एक नोव्हेंबर रोजी हयात असलेबाबतचा दाखला देणे करिता विद्यापीठाचा विविध नमुन्यातील फॉर्म भरून तो विद्यापीठाचे विद्यमान अधिकारी अथवा बँकेचे शाखा अधिकारी यांचे साक्षांकन घेऊन सहायक नियंत्रक-(१) मफुकृवी.,राहुरी यांना सादर करावा लागत असे.
निवृत्ती वेतनधारकांचा कार्यालयास प्रत्यक्ष भेटीचा त्रास कमी करण्याचे उद्देशाने चालू वर्षी सेवानिवृत्ती वेतनधारक अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक पुणे, धुळे, कोल्हापूर आणि राहुरी यांना हयातीचा दाखला जमा करण्याकरिता कृषी विद्यापीठ राहुरी येथे प्रत्यक्ष येणे आवश्यक नसून निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेत निवृत्तीवेतन घेत आहेत त्या बँकेत जाऊन आपले ओळखपत्र उदा.आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक इत्यादी दर्शवून विद्यापीठाने पाठविलेल्या बँक यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठा द्यावा. ज्या निवृत्ती वेतनधारकांना प्रत्यक्ष बँकेत जाणे शक्य नसेल अशा निवृत्ती वेतनधारकांनी विविध नमुन्यातील साक्षांकन केलेला हयातीचा दाखला पाठविल्यास तो स्वीकारला जाईल. तरी निवृत्ती वेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील व नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी केले आहे.