कृषी
पुणे येथील शेती उत्पादनावर आधारीत प्रदर्शनात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा सहभाग
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या स्टॉलला शेती उत्पादनावर आधारीत प्रदर्शनात शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील जागतीक बँक अर्थसहाय्यीत भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली पुरस्कृत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापन प्रकल्पाने पुणे येथील 1 ते 2 नोव्हेंबर, 2022 या दरम्यान आयोजीत शेती उत्पादनावर आधारीत प्रदर्शनात सहभाग घेतला. या प्रदर्शनात हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापन प्रकल्पाने तयार केलेले नाविन्यपूर्ण अविष्कार प्रदर्शित केले होते.
या प्रात्यक्षिकांना शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला राहुरी कृषि विद्यापीठाच्या प्रदर्शन स्टॉलला केंद्रिय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री ना. नरेंद्रसिंह तोमर, महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री ना. अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री ना. संदिपान भुमरे, केंद्रिय कृषि आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज अहुजा, केंद्रिय फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट दिली. यावेळी संशोधन संचालक व कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी मान्यवरांना प्रकल्पाने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली.
विद्यापीठाच्या या स्टॉलमध्ये ड्रोन, ऑटो पी.आय.एस., स्मार्ट पी.आय.एस., स्वयंचलीत पंप प्रणाली आणि सेंसर आधारीत सिंचन प्रणाली या तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा समावेश होता. कास्ट प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, कृषि यंत्रे व शक्ति विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, जलसिंचन व निचरा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनिल कदम, डॉ गिरीष भणगे, डॉ. प्रज्ञा जाधव आणि इंजि. विशाल पांडेय यांनी मान्यवरांना व उपस्थित शेतकर्यांना या तत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. सदर प्रदर्शनास सहभागी होण्यासाठी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ आणि संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व प्रदर्शनाचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले.