ठळक बातम्या
अन्यथा तहसीलवर बिऱ्हाड मोर्चा – कृषीभूषण प्रभाताई घोगरे यांचा इशारा
लोणी : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू म्हणणारे बिळात बसले असुन अतिवृष्टी होऊन दोन महिने उलटून गेले असताना शेतकऱ्यांना अजुनही एक दमडीची शासकीय मदत मिळाली नाही. ती तातडीने शेतकऱ्यांना द्या अन्यथा राहाता तहसीलवर महिला व शेतकऱ्यांचा पशुधनासह बिऱ्हाड मोर्चा काढला जाईल असा ईशारा लोणी खुर्दच्या ग्रां.पं.सदस्या कृषीभुषण प्रभाताई जनार्दन घोगरे यांनी दिला आहे.
राहाता तालुक्यासह लोणी खुर्द परीसरात दोन महिन्यात दोनदा अतिवृष्टी झाली. खरीप पिकांचे प्रंचड नुकसान झाले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची मंत्र्यांनी प्रशासकीय फार्स दाखवून एक दोन ठीकाणी पाहाणी दौरेही केले. शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन दिवाळी सनाच्या अगोदर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देवुन त्यांची दिवाळी गोड करण्याची घोषणाही सरकार कडुन करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अजुन एकाही शेतकऱ्याला मदत मिळालीच नाही. शेतकऱ्यांना मदती अभावी आर्थीक संकटात दिवाळी साजरी करावी लागली. हे शासन व प्रशासनाचे अपयश आहे.
शासकीय मदतीला नेमके कोणते ग्रहण आडवे आले हाचं मोठा प्रश्न आहे. ही अतिशय असंवेदनशील प्रकार आहे. रब्बी हंगाम सुरु झालेला आहे. शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या शेतात पिके उभे करावायाची आहे. त्यात अतिवृष्टीतील नासाडी झालेल्या खरिपाचे कर्ज डोक्यावर तसेच आहे. जनावरांच्या चारा पिकांचाही मोठा प्रश्न आहे अशी परिस्थिती असताना मदतीच्या नावाखाली सरकारकडून शेतकऱ्याची चेष्टाच मांडली आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही गांभीर्य सरकराला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधुन तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अतिवृष्टीने खरीप वाया गेला मात्र शासनाच्या मदतीमुळे रब्बीची पिके उभारण्याकरिता शेतकऱ्यांकडून मदत होईल, मात्र प्रशासनाकडून दोन महिन्यापासून पंचनाम्याचे केवळ नाटक करुन कागदीघोडे नाचण्याचा प्रकार सुरु आहे. तातडीने शेतकऱ्यांना मदत द्या अन्यथा राहाता तहसीलवर महिला व शेतकऱ्यांचा पशुधनासह बिऱ्हाड मोर्चा काढला जाईल असा ईशारा लोणी खुर्दच्या ग्रां.पं.सदस्या कृषीभुषण प्रभाताई जनार्दन घोगरे यांनी दिला आहे.