महाराष्ट्र
भूमी फाउंडेशनच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी बी आर चेडे
श्रीरामपूर : येथील जेष्ठ पत्रकार, छायाचित्रकार व सामाजिक कार्यकर्ते बी आर चेडे यांची भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी व अहमदनगर जिल्हा सल्लागारपदी श्रीरामपूर व्ही आय पी विश्रामगृह येथे महात्मा गांधी जयंतीदिनी झालेल्या कार्यक्रमात नियुक्ती करण्यात आली.
बी आर चेडे यांना नियुक्ती पत्र संस्था अध्यक्ष प्रा कैलास पवार यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल मार्गदर्शक मा प्राचार्य टी इ शेळके, उद्योजक किशोर निर्मळ, संपादक प्रकाश कुलथे, साहित्यिक डॉ बाबुराव उपाध्ये, प्रा शिवाजीराव बारगळ, सुकदेव सुकळे, अनिता फापाळे, सुरेश पा गलांडे, सरपंच सुभाष बोधक, ता. खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेशराव मुदगुले, चेअरमन किशोर पाटील आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.