अहिल्यानगर
11 ऑक्टोबर रोजी धुमाळ करणार प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शेती महामंडळाचे मोबदला म्हणून देय केलेल्या क्षेत्राचा 7/12 व 8 अ चा उतारा मिळणेसाठी राधाकृष्ण धोंडीराम धुमाळ हे दि 11 ऑकटोबर रोजी श्रीरामपूर येथील प्रांतधिकारी कार्यालय समोर सहकुटुंब उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनाही निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मी मूळ खंडकरी असून मातापूर येथील गट क्र 62 मध्ये 6 एकर 31 गुंठे हे क्षेत्र शेती महामंडळला खंडाने दिले होते. त्यापैकी 1975 या वर्षी 4 एकर 20 गुंठे हे खंडकरी वाटप मध्ये मिळाले, त्यापैकी राहिलेले 2 एकर 10 गुंठे हे क्षेत्र उंबरगाव गट क्र 29 मध्ये 1965 साली आमच्या वडिलांना कसण्याकरिता 70 आर क्षेत्र दिलेले होते. सदर क्षेत्राची सपाटीकरण करून विहीर खोदली व इले. मोटर व पाईप लाईन करून ते क्षेत्र बागायती केले. पूर्वीचे मोबदला क्षेत्र 70 आर अधिक आमचे शेती महामंडळाकडे राहिलेले 20 आर असे मिळून 2.10 आर क्षेत्र उंबरगाव गट क्र 21 मध्ये पूर्वीच्या क्षेत्राला जोडून द्यावे असे आयुक्त नासिक यांनी जिल्हाधिकारी यांना 6 जुन 2013 रोजी आदेश दिले होते.
सदर क्षेत्राची 7/12 वर नोंद नसल्याने मला सदर क्षेत्रात पीक घेण्यासाठी पीक कर्ज मिळत नाही, पिकाचा विमा उतरवता येतं नाही, शासकीत योजनाचा लाभ घेता येत नाही. तरी गट क्र 21 च्या 7/12 व 8 अ च्या उताऱ्यावर नोंद लावावी तसे न झाल्यास उपोषणास बसणार असल्याचा राधाकृष्ण धुमाळ यांनी इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रति खा सदाशिव लोखंडे, आ लहू कानडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, पोलीस निरीक्षक श्रीरामपूर व तहसीलदार श्रीरामपूर यांना दिल्या आहेत.