ठळक बातम्या
लोणी खुर्द मध्ये ढग फुटी सदृश परिस्थिती; माणिकनगर मध्ये घरात पाणी तर भीमनगर पाण्याखाली
लोणी : लोणी खुर्द गावामध्ये ढग फुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे गावातील माणिक नगर, भीमनगर, दत्तनगर भागात पाणीचं पाणी झाले. तसेच जनावरांच्या बाजाराजवळील भीमनगर येथे वास्तव्यास असलेले बरेच कुटुंबांचे संसार पाण्याखाली गेल्याने मोठे नुुकसान झाले.
त्या कुटुंबांचे रात्री उशिरापर्यंत सरपंच जनार्दन घोगरे व गावातील नागरिकांच्या मदतीने कृषी उत्पन्न बाजार समिती गोडाऊन, जि.प प्राथमिक शाळेत स्थलांतर करण्यात आले. रात्री त्या कुटुंबाला गावातील गणेश मंडळांकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. घटनास्थळी रात्री उपविभागीय आधिकारी गोविंद शिंदे, राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच नुकसान झालेल्या नागरिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
लोणी खुर्द गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असुन सोयाबीन, बाजरी, मका, जनावरांचे चारा पिके पाण्यात गेले तर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांकडून प्रचंड मनःस्ताप व्यक्त केला जात आहे.
लोणी खुर्द गावात झालेल्या पावसामुळे नागरिक व शेतकरी यांचे प्रंचड नुकसान झाले आहे.लोणी खुर्द ग्रांमपंचायतीचे प्रशासन आपल्या पाठीशी आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून बाधीतांना मदत करावी._ जनार्दन घोगरे; सरपंच ग्रा.पं. लोणी खुर्द
रात्री सुमारे दिड वाजेपर्यंत घटनास्थळी सरपंच जनार्दन घोगरे, मंडळधिकारी आनिल मांढरे, कामगार तलाठी मंजुश्री देवकर यांच्यासह ग्रा.प कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.