अहिल्यानगर

हरिगाव मतमाउली यात्रापूर्व सहावा नोव्हेना संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरिगाव मतमाउली यात्रापूर्व सहावा नोव्हेना भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. त्याप्रसंगी राहाता येथील धर्मगुरू फ्रान्सिस ओहोळ यांनी सांगितले की, आज आपला नोव्हेनाचा विषय आहे सांत्वनकर्तीनित्य सहाय माता मरिया” पवित्र मरीयेच्या जीवनाकडे पाहून ती एक अशी स्त्री होती ती भयाण अशा दु:खातून गेली होती.
तिने परमेश्वराचा शब्द ऐकला, आज्ञा पाळली. प्रभू येशूच्या जन्मापासून ते मरणापर्यंत ती खूप सोशिक बनली. फार गोष्टी सहन केल्या. मानवी दु:ख यातना काय आहेत त्या ओळखल्या. म्हणून पवित्र मरिया सर्वांचे सांत्वन करण्यासाठी सदैव सज्ज असते. या जगात अनेक दुखी असतात तेंव्हा आपण तिचा धावा करतो. तिला दुखाची जाण आहे, जी व्यक्ती आपले दु:ख हलके करू शकते अशा व्यक्तीकडे धाव घेतो. या पृथ्वीतलावर या सगळ्या दु:खातून जाणारी देवाची आई ती म्हणजे पवित्र मरिया तिच्याकडे पाहिले तर आपली सर्व दु:ख हलके होतात. हरिगाव यात्रेला अनेक जन येतात त्यांना पवित्र म्रीयेचा स्पर्श होतो आणि हे दैवत्व तिला परमेश्वराने बहाल केले व परमेश्वरामुळे तिच्या ह्या आशीर्वादाने अनेक लोकांच्या जीवनामध्ये आनंद, दया प्रेम व शांती आहे.
प्रभू येशूचे दु:ख सांत्वन करण्यासाठी कोणी नव्हते. त्याला फक्त हे माहित होते की परमेश्वराची इच्छा पूर्ण करेन, कारण जगाचे तारण व्हावे. त्या तारणासाठी भूतलावर येण्यासाठी पवित्र मरीयेची निवड झाली. जेंव्हा देवाच्या नजरेत आपण येतो तेंव्हा पावन होतो. मरिया पावन झाली व आज ती अनेकांची जीवन पावन करते. पवित्र मरीयेच्या प्रार्थनेत प्रचंड सामर्थ्य आहे. ती कधी आपल्याला एकटे सोडत नाही. सदैव आपल्या सोबत राहते. तिला देवदूताचा संदेश जेंव्हा मिळाला तेंव्हा तिला काही कल्पना नव्हती. गोंधळून गेली होती. तिला एव्हढेच माहित होते की परमेश्वर माझ्या सोबत आहे. त्यामुळे मला भीती नाही. म्हणून प्रभू येशू क्रुसावर जाईपर्यंत वेदना सहन केल्या. प्रत्येकाच्या पापाचे शालन व्हावे, सर्वांनी आनंदी जीवन जगावे, उदाहरण म्हणून एक स्त्रीने सांगितले तिला ९/१० वर्षे मुल होत नव्हते. प.मरीयेकडे आली तिला एक मुल झाले व झोळीत घेऊन पदयात्रेने येण्याचा नवस फेडला.
आज ती कशा प्रकारे सांत्वन करणारी माता आहे यावर मनन चिंतन करीत आहोत. प.मरिया प्रत्येक क्षणी आपल्या जीवनात सांत्वन करण्यासाठी येते त्याच प.मरीयेने आम्हा सर्वांचे सांत्वन करावे. विशेष करून या जगामध्ये जे दु:ख संकटात, कष्टात आहेत. त्या सर्वांच्या जीवनात शांतता यावी व पवित्र मरीयेच्या मध्यस्थीने सांत्वन करावे म्हणून विशेष प्रार्थना करू या. 
आज नोव्हेना प्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारीओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, संजय पंडित, जॉन गुलदेवकर आदी धर्मगुरु सहभागी होते. दि. ७ सप्टेंबर रोजी घोडेगाव येथील धर्मगुरू डॉमनिक ब्राम्हणे हे “पवित्र मरीयेचे पृथ्वीवरील प्रकटीकरणाव्दारे मिळालेला संदेश या विषयावर प्रवचन करणार आहेत.

Related Articles

Back to top button