अहिल्यानगर
राहुरी शहरातील प्रभागात सौर ऊर्जा केली विकसित, नागरिकांनी लाभ घेण्याचे माजी मंत्री तनपुरेंचे आवाहन
राहुरी | बाळकृष्ण भोसले – शहरातील लक्ष्मी नगर व राजवाडा परिसरात गेल्या ५ वर्षात शासनाकडून प्राप्त झालेल्या विविध निधीतून विविध विकास कामे पूर्ण केली आहे. आता या प्रभागातील नागरिकांना रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडीत झाल्यास सौर ऊर्जेवर वीज उपलब्ध करून दिली आहे. याचा उपभोग प्रभागातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.
श्री तनपुरे म्हणाले की शासनाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून जो निधी प्राप्त झाला त्या निधीतून लक्ष्मीनगर व राजवाडा या दोन्ही प्रभागात आज १० सोलर हायमॅस्ट पथदिवे व १०० सोलर दिवे बसविण्यात येणार असून त्या कामाचा शुभारंभ लक्ष्मीनगर येथे करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रात्री वीज गेली तरी उजेड मिळणार आहे त्याचा योग्य उपयोग करावा असे आवाहन आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी केले. सौर ऊर्जेवर जी वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यास कुठल्याही प्रकारचे वीज बिल आकारले जाणार नाही.
ते म्हणाले गेल्या ५ वर्षात ह्या दोन्ही प्रभागात कोट्यावधी रुपयाच्या निधीतून कामे मार्गी लावली आहे. मंत्री म्हणून काम करताना अडीच वर्षात जे जे करता आले ते केले असून भविष्यात तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून अजून जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार, नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, सोन्याबापू जगधने, गजानन सातभाई, राहुलभैय्या शेटे, संतोष आघाव, महेश उदावंत, एकनाथ तनपुरे, अभिजीत धाडगे, अवधूत कुलकर्णी, वैभव वराळे, संतोष जगधने, ज्ञानेश्वर जगधने, निलेश जगधने, कांतीलाल जगधने, किशोर कातोरे, प्रवीण गिरगुणे, रमेश जगधने आदि उपस्थित होते.
तर राजवाडा परिसरात सोलर हायमॅस्ट व सौर ऊर्जेवरील पथदिवे बसविण्याचे कामाचा शुभारंभ आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक संजय साळवे, दिपक साळवे, दादू साळवे, किरण साळवे, नगरसेवक विलास तनपुरे, दशरथ पोपळघट, प्रकाश भुजाडी, नंदकुमार तनपुरे आदि उपस्थित होते.