अहिल्यानगर

छावा चे उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित

संगमनेर शहर – घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारा विरोधात छावा क्रांतीवीर सेनेचे आमरण उपोषण संगमनेर पंचायत समिती येथे चालु होते. घुलेवाडी येथील रहिवासी छावा क्रांतीवीर सेनेचे कामगार तालुकाध्यक्ष संदिप राऊत यांनी आमरण उपोषणास बसले होते. त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजश्री वाकचौरे, तालुका उपाध्यक्ष सचिन गांजवे, वि.आघाडी तालुकाध्यक्ष लक्ष्मण सातपुते, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष नवनाथ राऊत, तालुका संपर्क प्रमुख गणेश फरगडे, आशिष गवळी, सतीश गोपाळे, दत्ता शिंदे, भागवत कानवडे, सचिन कानवडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
उपोषणाची दखल घेण्यासाठी भाजपा चे एक शिष्टमंडळ उपोषण स्थळी पोहचले. त्यांनी गटविकास अधिकारी यांना उपोषण स्थळी बोलावून मध्यस्थी करत ग्रामविकास अधिकारी सुभाष कुटे यांच्या चुका उघडकीस आणुन दिल्या. संघटनेच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर ग्रामपंचायत ने मोटर व इतर साहित्य चोरी गेल्याचे पोलीस तक्रार केल्याचेही गटविकास अधिकारी यांनीही कबुल केले. तसेच जुनी ग्रामपंचायत इमारत चे मटेरियल लिलाव संदर्भात सर्व बाबी तपासुन कारवाई करण्याचे आश्वासन तसेच निवृत्त कर्मचारी कामावर तसेच विना परवाना वाहन चालक ग्रामपंचायत वाहने चालवत असल्यास गंभीर दखल घेऊन कारवाई करणे तसेच ऐन वेळी घुलेवाडी ग्रामस्थांनी घेतलेले मुद्दे ही गटविकास अधिकारी यांनी दखल घेत सी सी टीव्ही यंत्रणा गावात कार्यान्वित करणे, महिला दिन महिला, विशेष सभा दंवडी देऊन घेणे, असे अनेक मुद्दे घेतले गेले.
यावेळी उपोषण करते आधिक आक्रमक होऊन त्यांचे मुद्दे मांडत ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई ची मागणी केल्यामुळे भाजपा प्रदेश सदस्य रविंद्र थोरात, राहुल दिघे, दादाभाऊ गुंजाळ यांनी मध्यस्थी करत १५ दिवसाचे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी यांच्या कडून घेत विस्तार अधिकारी कासार यांच्या अध्यक्षते खाली चौकशी करून अहवाल सादर करून उचित कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या हस्ते उपोषण सोडवण्यात आले.

Related Articles

Back to top button