क्रीडा

मतमाउली यात्रेनिमित्त कबड्डी स्पर्धेत ओन्ली साई संघ प्रथम

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरिगाव येथे मतमाउली यात्रेनिमित्त संत तेरेजा क्लब हरिगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य पुरुष गट कबड्डी स्पर्धेत ओन्ली साई संघ टाकळीभान हा अंतिम सामन्यात विजयी होऊन प्रथम क्रमांकाचे बक्षीस रु ४१०००/- व चषक पटकाविला आहे.
व्दितीय रु ३१०००/- व चषक साई सेवा क्रीडा संघ औरगाबाद, तिसरे बक्षीस रु २१०००/-व चषक भारतीयम संघ उन्दिरगाव, चतुर्थ रु १५०००/-खुशबू आईस्क्रीम संघ रायगड, पाचवे जयहिंद क्रीडा मंडळ श्रीरामपूर, सहावे राकेशभाऊ घुले पुणे, सातवे प्रीमियम संघ अलिबाग, आठवे आझाद टाकळीभान संघ अशा ४ संघांना प्रत्येकी रु ७०००/- त्याचप्रमाणे प्रीमियम अलिबाग, राकेशभाऊ घुले क्रीडामंडळ पुणे, ओमसाई क्रीडा मंडळ जुन्नर यांना उत्कृष्ट संघ विभागून बक्षीस देण्यात आले आहे. साई सेवा क्रीडा औरंगाबादच्या जावेद पठाण यास उत्कृष्ट रायडर बक्षीस, उत्कृष्ट बचाव बक्षीस भारतीयंम संघ उन्दिरगावच्या महम्मद चाऊस याला मिळाले. या सर्व संघाना बक्षीस वितरण फा डॉमनिक रोझारिओ, रिचर्ड अंतोनी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्लब अध्यक्ष बी सी मंडलिक, उपाध्यक्ष डी एस गायकवाड, सुनील साठे, किशोर कदम, बाबुराव सूर्यवंशी, अशोक त्रिभुवन, विलासराव मकासरे, हेमंत शिरसाठ, अशोक फुलारे, प्रकाश बांद्रे, सदानंद शिरसाठ, रियाज शेख, उमेश गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले. विजयी संघांचे अभिनंदन माजी चेअरमन सुरेश गलांडे, राजेंद्र पाउलबुद्धे, सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, अनिल भनगडे, पीटर जाधव, अमोल नाईक आदींनी केले.

Related Articles

Back to top button