वाहेगाव येथे गुलाबी बोंडअळीचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन..
सध्या कपासीचे पिक चांगले आलेले आहे. परंतु गत चार वर्षापासून कपासीवरील कापसावर बोंडअळी पडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल होत चालला असल्याने वाहेगाव येथे शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमामध्ये धरती ऍग्रो सीड्स श्रीरंग शेळके यांनी कापूस पिकावरील रोग खत नियोजन यावर मार्गदर्शन केले. तसेच बायर क्रॉप सायन्स राहुल दहिहंडे यांनी शेतकऱ्यांना शेंदरी बोंडअळी व्यवस्थापन व कामगंध सापळे यांचा वापर शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनात कसा करायचा यावर प्रशिक्षण दिले व सगळ्यांना मोफत कामगंध सापळे देऊन शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी त्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला कृषी विक्रेते व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन श्रीरंग शेळके धरती ऍग्रो सीड्स व राहुल दहीहंडे बायर क्रॉप सायन्स(बोलगार्ड) यांनी केले. याप्रसंगी गणेश बोबडे, बापु बोबडे, सोनाजी बोबडे, बळवंत बोबडे, सोपान बोबडे, संतोष बोबडे, कृष्णा बोबडे ,रविंद्र बोबडे, अंकुश बोबडे, नारायण बोबडे. आदिनाथ मिसाल, मनोज बोबडे,बप्पासाहेब वखरे, दिनेश पेंढारकर सह आदी शेतकरी उपस्थित होते.