ठळक बातम्या
“हर रायझिंग अवार्ड” या भारतीय सर्वात प्रेरणादायी पुरस्काराने विन्सी त्रिभुवन सन्मानित
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील रहिवासी व सह्याद्री हॉस्पिटल प्रा.लिमिटेड पुणे महाव्यवस्थापक [पारिचारिका विभाग] व अशोक बाळू त्रिभुवन [पोलीस विभाग] यांच्या पत्नी विन्सी त्रिभुवन यांना उत्कृष्ट कार्याबद्दल “हर रायझिंग अवार्ड”हा भारतातील सर्वात प्रेरणादायी पुरस्कार नाविन्यता, मार्गदर्शन, व्यावसायीकता, नेतृत्व या बद्दल मिळाला आहे.
१५०० अर्जदारांमध्ये आरोग्य विभागातील प्रेरणादायी महिलांची या श्रेणीमध्ये निवड करण्यात आली आहे. या श्रेणीमध्ये त्या भारतातील सर्वोत्कृष्ट ३ महिलांपैकी एक पुरस्कारप्राप्त महिला ठरल्या आहेत. जॉब फॉर हर यांच्या समितीने २०२२ चा हर रायझिंग अवार्ड त्यांना आरोग्य विभागातील लक्षणीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला आहे.
महाव्यवस्थापक विन्सी त्रिभुवन यांना “हर रायझिंग अवार्ड”मिळाल्याबद्दल उद्योजक किशोरअण्णा निर्मळ, भूमी फौंडेशन म.राज्य संस्थापक अध्यक्ष प्रा कैलास पवार, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान चेअरमन माजी प्राचार्य टी इ शेळके, पत्रकार बी आर चेडे, मुंबई पोलीस विभाग अशोक त्रिभुवन, आरोग्यमित्र भीमराज बागुल आदींनी अभिनंदन केले आहे.