अहिल्यानगर
मानोरीचे लोकनियुक्त सरपंच शेख यांच्या माध्यमातून मांजरी गावात पाणी वाटप
मांजरी : १४ गाव पाणी पुरवठा योजना मुळा नदीच्या पात्रात फुटल्याने या गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज मांजरी गावातील नागरिकांना मानोरीचे लोकनियुक्त सरपंच दयावान शेख यांच्या माध्यमातून पाणी वाटप करण्यात आले. यामुळे येथील मांजरी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी रावसाहेब विटनोर, नानासाहेब जुधांरे, प्रा.भानुदास चोपडे, धनंजय विटनोर, तुषार विटनोर, प्रविण बिडगर, रामभाऊ विटनोर, राहुल विटनोर आदी उपस्थित होते.