अहिल्यानगर
तरुणांनी उद्दोग, व्यवसायात आधुनिक विचार व कष्टातुन नावलौकिक मिळवावा – आ. जगताप
अहमदनगर : जिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अहमदनगर आयोजित तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व रविदासिया चेंबर ऑफ काॅमर्स ॲण्ड इंडस्ट्री यांच्या विशेष सहकार्याने विशेष घटक योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या लेदर प्रोडक्टस प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमाणपत्र वितरण सोहळा नगरचे आ. संग्रामभैय्या जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी आ. संग्रामभैय्या जगताप, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, रविदासिया चेंबर ऑफ काॅमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, जिल्हा उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, महानगरपालिकेचे इंजिनिअर निकम, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष सुरेश बनसोडे, लेखक डाॅ. रोहिदास नामदेव उदमले, अहमदनगर एक्सप्रेस चे कार्यकारी संपादक भैय्यासाहेब बाॅक्सर, शिवगर्जना न्यूज चॅनल चे अमोल डोळस, उद्योजक बाबासाहेब आंबेडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
10 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या एक महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रमात नगर शहरातील व तालुक्यातील युवक युवतींनी सहभाग घेऊन हा प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडले. संपूर्ण महाराष्ट्रात हा लेदर प्रोडक्टस प्रशिक्षण कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात आले. लेदर प्रोडक्टस चे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी यांनी विविध प्रकारचे वस्तूंचे प्रदर्शन ही यावेळी ठेवण्यात आले होते. या सर्वांची पाहणी मान्यवरांनी करून प्रशिक्षणार्थी चे अभिनंदन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लेखक डाॅ. रोहिदास उदमले लिखित संत रोहिदास महाराज- तात्विक व शैक्षणिक विचार या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.
आ. संग्रामभैय्या जगताप यांनी युवकांनी उद्योग व्यवसायात नावलौकिक करून समाजातील इतर लोकांना सुध्दा आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा शिक्षण देण्यासाठी या प्रशिक्षणाचा भविष्यात उपयोग करण्याचा सल्ला उपस्थित सर्वांना दिला. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे यांनी भविष्यात अशाच प्रकारचे विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवुन युवक युवतींना यशस्वी उद्योजक होण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन उद्योग उभारणीसाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. रविदासिया चेंबर ऑफ काॅमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष संजय खामकर यांनी समाजातील युवक, युवती व महिलांना रोजगार निर्मितीसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी व संस्थेच्या माध्यमातून नवउद्योजक घडविण्यासाठी सर्व संस्थेचे पदाधिकारी यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. बार्टीचे अहमदनगर जिल्हा समतादूत प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांनी उपस्थितांना बार्टीच्या प्रकल्प विषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाची प्रस्तावना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे यांनी केली. या प्रशिक्षणार्थी ना प्रशिक्षण देणारे अमोल सोनवणे, रवी गाडे, विकास बोरूडे, किरण भागवत, संतोष कदम, विशाल पोटे, संतोष कांबळे यांचा सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार प्रियंका शेळके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुभाष मराठे, संदिप सोनवणे, बार्टीचे समतादूत पिरजादे एजाज, प्रेरणा विधाते, रजत अवसक, संतोष शिंदे, वसंत बढे, रवी कटके, सुलतान सय्यद यांनी विशेष प्रयत्न केले.