सामाजिक

हरिगांव येथे 180 नागरिकांची मोफत नेत्र तपासणी

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अग्निपंख फाउंडेशन उंदीरगाव-हरेगाव तसेच श्री. जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उदघाटन अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश पाटील गलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ विक्रांत खरात, उंदिरंगाव वि.वि.का.सोसायटीचे चेअरमन प्रमोद भालदंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रतिनिधी संकेत भालेराव, जेष्ठ नागरिक ए. टी हिवाळे, सुभाष पंडित, पीटर जाधव, ग्रा.सदस्य दीपक बोधक, चंद्रकांत गायकवाड, साठे तसेच अग्निपंख फाउंडेशन चे सर्व सदस्य व उंदिरगाव-हरेगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिराचा 180 नागरिकांनी लाभ घेतला. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले व ज्या लाभर्थ्यांना मुले नाहीत असे 10 वयोवृध्द नागरिकांना अग्निपंख फाउंडेशन तर्फे मोफत चष्मा वाटप करण्यात आले. तसेच 10 लाभार्थ्यांचे मोतीबिंदू चे मोफत ऑपरेशन करून देणार आहेत. त्यावेळी सुरेश पाटील गलांडे यांनी अग्निपंख फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button