साहित्य व संस्कृती
समुद्रसंगीत
लाटेमागून लाट उसळते
किनाऱ्यावर अलगद आदळते
फुटते
थेंबांची होते उधळण
हे तर समुद्राचे नर्तन
आणि दिव्य ते
गर्जत गायन
अनंत आभाळाखाली
सुरुच असते ही
सागराची
अथांग मैफल
किती बघावी
किती ऐकावी
किती साठवावी
डोळ्यात
किनाऱ्यावर प्रेक्षक येतील
जुने जातील
नवे येतील
नवे जुने होतील
पुन्हा नवे येतील
समुद्रसंगीत
सुरुच राहील
अहोरात्र
अखंडअनुपमा जाधव, डहाणू जिल्हा- पालघर; भ्रमणध्वनी ८७९३२११०१७