अहिल्यानगर

अमन सोशल असोसिएशन तर्फे राहुरी तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

राहुरी विद्यापीठ | जावेद शेख : तालुक्यातील अमन सोशल असोसिएशन तर्फे राहुरी तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक २८ सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी ५ वा. सहकार महर्षी डॉ.दादासाहेब तनपुरे सभागृह, राहुरी या ठिकाणी आयोजित केला होता. राहुरी तालुक्यातील ज्या शिक्षकांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे, अशा तालुक्यातील १९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्याचे काम अमन सोशल असोसिएशन, राहुरी यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक शमसुद्दीन इनामदार तसेच चित्रकला विषयात नाव लौकिक असलेले संदेश विसपुते यांना अमन सोशल असोसिएशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची मान अहमदनगर जिल्ह्यामध्ये अभिमानाने उंचावली आहे.
या कार्यक्रमावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा .जितेंद्र मेटकर यांनी आपल्या शैलीने मार्गदर्शनपर व्याख्यान देताना सर्व उपस्थितांची मने जिंकली. त्यांचे व्याख्यान हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षणच ठरले होते. मार्गदर्शन पर व्याख्यान देताना त्यांनी सांगितले की, आपला भारत देश महासत्ता होण्यासाठी हिंदू मुस्लीम ऐक्य तसेच जात -पात, धर्म – पंथ, आहार – विहार, वेशभूषा अशा गोष्टींना थारा न देता आपण या भारत मातेची लेकरं आहोत या नात्याने जगले पाहिजे. प्रा. जितेंद्र मेटकर यांनी आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गुणगौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद रसाळ हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीचे सभापती अरुण तनपुरे, म.फु.कृ.वि.राहुरीचे जल व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, केशर उद्योग समूहाचे अध्यक्ष सागर तनपुरे, तालुक्यातील विविध शाळेतील शिक्षक, अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button