ठळक बातम्या
इपीएस ९५ पेंशनर्स प्रश्नी आम्ही लक्ष घातलेले आहे – ना.प्रल्हादसिंह पटेल
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आज दि २९ सप्टेंबर रोजी स्वयंवर मंगल कार्यालय श्रीरामपूर येथे केन्द्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती मंत्री प्रल्हादसिंह पटेल हे लोकसभा प्रवास योजना अंतर्गत आलेले होते. यावेळी इपीएस ९५ पेन्शनर्स संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन त्यांनी बारकाईने वाचून आपल्या भाषणामध्ये इपीएस पेन्शनर्स प्रश्न सोडविणेसाठी सरकार सध्या काम करीत आहे. तुम्ही निश्चिंत राहा, तुमचे काम होईल असे सांगितले. शिष्टमंडळाबरोबर चर्चा करताना त्यांनी निवेदनावरील एक दोन मुद्द्यावर स्पष्टीकरण मागितले. प.भारत संघटक सचिव सुभाष पोखरकर यांना त्याचे स्पष्टीकरण दिले. मी दिल्लीला गेल्यावर कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांचेशी चर्चा करतो व त्याप्रमाणे तुम्हाला कळवितो असे सांगितले.
शिष्टमंडळामध्ये पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर, जिल्हा उपाध्यक्ष एस के सय्यद, राहता तालुकाध्यक्ष सुकदेव आहेर, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष राधाकृष्ण धुमाळ, सचिव दिलावर पठाण, राहुरी अध्यक्ष ज्ञानदेव डौले, संगमनेर उपाध्यक्ष सुलेमानभाई शेख, संपतराव मुठे, ज्ञानदेव पटारे, भारत छल्लारे, सुरेश राठोड, गांडोळे याचेसह ७० पेन्शनर्स उपस्थित होते.