कृषी
राज्य स्तरीय खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेत सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी मारली बाजी
राहुरी : कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व तिफन फाऊंडेशन संचलित सहाय्यक कृषि अधिकारी परिवार, तसेच राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य स्तरीय खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा सन २०२२ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कृषी महाविद्यालय, सोनई या महाविद्यालयाच्या बी. एस. सी. ॲग्रीच्या अंतीम वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषीकन्यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
आंतरवली येथे कृषी महाविद्यालय सोनईच्या कृषी कन्या वैष्णवी रावसाहेब अडसुरे, मिताली सुनिल भालेराव, सिमरन हुंडारे, वर्षा बावा, भावना गोल्हार, व शिल्पाराणी आसबे आदींनी २७ जून २०२२ रोजी शेतकर्यांना सोयाबीन या पिकावरील बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले होते. या प्रात्यक्षिकात वाढीव उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणीनंतरच नाही तर पेरणीच्या पुर्वीही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पेरणीसाठी त्या पिकाचे बियाणेही तेवढेच महत्वाचे आहे. शिवाय पेरणारे बियाणेच जर हलक्या प्रतीचे आणि निकृष्ट असले तर उत्पादन सोडाच पण पिकाची वाढही योग्य पध्दतीने होणार नाही. म्हणूनच पेरणीपूर्वी बियाणाचे रोग-किडीपासून संरक्षण (Protection From Diseases and Pests) व्हावे म्हणून औषध लावण्याच्या प्रक्रियेला बीजप्रक्रिया म्हणतात. अशा प्रकारे बीजप्रक्रिया पेरणीपूर्वीची महत्वाची क्रिया या विषयी कृषी कन्यांनी आंतरवली येथे बीजप्रक्रियेवर मार्गदर्शन केले होते. यावेळेस या कृषीकन्यांना महाविद्यालयाचे प्रा. डॉ.मोरे, कार्यक्रम अधिकारी जाधव मॅडम, प्रा.संतोष चौगुले आणि विषय विशेषज्ञ प्रा.सचिन खाटिक यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या संस्थापिका तथा माजी महसूलमंत्री डॉ शालिनीताई पाटील, अध्यक्ष संतोष तांबे, सरचिटणीस नितीन भैय्या देशमुख, संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भागचंद औताडे, उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जालिंदर शेडगे, डिग्रस ग्रामपंचायतचे उपसरपंच ज्ञानेश्वर भिंगारदे, मोरया ग्रुपचे गोरख अडसुरे, रंगनाथ माने, मच्छिंद्र जगताप, बाबासाहेब चेडे, जिल्हाध्यक्ष नवनाथ ढगे, सुभाष दरेकर, संदीप उंडे, सचिन गागरे, शेखर पवार, शाम कदम, बाळासाहेब भोर, ऋषिकेश निबे, संदीप डेबरे आदींसह त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.