राजकीय

कचनेरच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय

विलास लाटे | पैठण : कचनेर येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सेवा सोसायटी संचालक निवडणुक २०२२ ते २०२७ साठी झालेल्या निवडणुकीत राजपालसिंह राठोड यांच्या नेतृत्वात व राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणूकीत शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.
कचनेर येथील प्रसिद्ध जैन मंदिर तिर्थक्षेत्र असणाऱ्या कचनेरच्या या निवडणुकीकडे नेहमीच सर्वांचे लक्ष असते. शिवाय अनेक मान्यवर व मातब्बर मंडळीसाठी प्रतिष्ठेची असणाऱ्या या निवडणुकीमुळे या तालुक्यातील पुढील राजकारण प्रभावीत होणार आहे म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. सदरील निवडणूकीत सुरूवातीलाच राजपालसिंह राठोड हे सर्वानुमते बिनविरोध निवडल्या गेले होते.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड करीत निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटातुन भानुसे दत्तात्रय, जाधव विनोद केशव, जाधव रावसाहेब, जाधव विनायक, गुसिंगे नरसिंग, चव्हाण कुंडलीक, चव्हाण सुभाष, जाधव योगेश, महिला राखीव गटामधून भानुसे बेबीबाई आप्पासाहेब, जारवाल पुराबाई धनसिंग, इतर मागास प्रवर्गातील क्षीरसागर ताराचंद तर अनुसूचित जाती जमाती मधुन घोरपडे शरद कडु यांचा समावेश आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवाराचे गावकऱ्यांतुन अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Back to top button