शिक्षणवारी ज्ञान पंढरी
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव व फिनोलेक्स कंपनीला भेट
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हाळगावच्या सर्व विद्यार्थ्यांना आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव व फिनोलेक्स पाईप्स इंडस्ट्रीज, पुणे येथे भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांना कृषि विज्ञान केंद्रामार्फत शेतकर्यांना कोणकोणत्या प्रकारची माहिती देण्यात येते, शेतकर्यांच्या दृष्टीने कृषि विज्ञान केंद्राचे महत्त्व, कृषि विज्ञान केंद्रामार्फत राबवण्यात येणारी विविध प्रकल्प या विषयांची माहिती कृषि विज्ञान केंद्राचे मृदा विशेषज्ञ योगेश यादव यांनी दिली.
फिनोलेक्स पाईप्स इंडस्ट्रीज, पुणे यांचेमार्फत विद्यार्थ्यांना या कंपनीमध्ये कोण कोणत्या प्रकारचे पाईप तयार होतात, शेतीच्या दृष्टीने कोणकोणते पाईप उपयोगी आहेत, पाईपचा दर्जा याविषयीची माहिती तज्ञांनी दिली. यानंतर कंपनीमध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये बोलताना बर्याच विद्यार्थ्यांनी फिनोलेक्स कंपनी विषयी व तयार होणार्या उत्पादनाच्या दर्जाविषयी समाधान व्यक्त केले तसेच या कंपनीमधील भेटीचा विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल.
या कंपनीच्या मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणारे सर्व उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. नारायणगाव येथील कृषि विज्ञान केंद्र व फिनोलेक्स इंडस्ट्रीज, पुणे येथे जुलै महिन्यातील 10, 17 व 24 रोजी विद्यार्थ्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांना कृषि विज्ञान केंद्राची व फिनोलेक्स कंपनीची भेट मिळण्यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी मार्गदर्शन केले.
या भेटीचे नियोजन महाविद्यालयाची विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. चारुदत्त चौधरी, डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. मनोज गुड, डॉ. प्रेरणा भोसले, प्रा. कीर्ती भांगरे, महेश सुरवसे, विशाल भोसले, अमृता सोनवणे, सौ. अंजली देशपांडे व सौ. वैशाली पोदे यांनी केले. या भेटीसाठी फिनोलेक्स कंपनीचे विभागीय विक्री व्यवस्थापक योगेश राऊत व अहमदनगर जिल्ह्याचे विक्री व्यवस्थापक दादासाहेब गडाख यांचे विशेष सहकार्य लाभले.