अहिल्यानगर
हरिगांव चर्च कडे जाणाऱ्या रस्त्याचा आ कानडे यांच्या हस्ते शुभारंभ
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरिगांव उंदिरगांव परिसरातील लोकांनी मला भरभरून मतदान करून निवडून दिले आहे. त्यामूळे मी आपल्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदार आहे. मतमाउली भक्तीस्थानाकडे जाणारा रस्ताची अत्यंत दुरावस्था झाली होती. यात्रेनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्या भक्तांना रस्ता सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे सदर रस्ता 25 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे प्रतिपादन आ.लहुजी कानडे यांनी रस्ता उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात केले.
संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तीस्थान मुख्य प्रवेशद्वार ते चोरडिया दुकान पर्यंत रस्ता उद्घाटन कार्यक्रम श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.लहूजी कानडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी संत तेरेजा चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.सुरेश साठे, संत तेरेजा बाॅईज हायस्कूल चे प्राचार्य मा.फा.डाॅमनिक रोझारियो, फा.रिचर्ड माजी नगरसेवक अशोक कानडे, प्रगतीशील शेतकरी शंकरराव आढाव, उंदिरगांव ग्रामपंचायत चे सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, महसूल मित्र राजेंद्र पाऊलबुद्वे, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक, काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, भा.ज.प.चे अनिल भनगडे, अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, अमरदिप भजनी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मगर, किरण साळवे, मतमाउली सामाजिक प्रतिष्ठानचे काईन पंडित, पॅरिश काॅन्सिल सभासद ज्यो दिवे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उंदिरगांव ग्रामपंचायत चे सरपंच सुभाष बोधक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संत तेरेजा चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा. सुरेश साठे यांनी शुभाशीर्वाद दिले. राजेंद्र पाउलबुधे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप गलांडे यांनी केले तर आभार संजय साळवे यांनी मानले.