राजकीय
बिडकीन सेवा सहकारी सोसायटीवर शिवसेनेचा भगवा
चेअरमन पदी ठाणगे तर व्हा. चेअरमन पदी जिलानी यांची बिनविरोध निवड
विलास लाटे | पैठण : तालुक्यातील बिडकीन येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे यांच्या नेतृत्वाखाली १३ संचालक बिनविरोध निवडून आले होते. नुकतीच चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पडली असून पेरे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या चेरअमन पदी निष्टावंत शिवसैनिक बबन ठाणगे यांची तर व्हाईस चेअरमन पदी हारून जिलानी यांची सर्वानुमते निवड करुन या सेवा सहकारी सोसायटीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे.
याप्रसंगी संचालक माणिक भिकाजी औटी, लहू कातबणे, अमोल कोथंबिरे, उमेश तिवाडी, उत्तम धर्मे, गणेश नरवडे, निवृत्ती हाडे, द्वारकाबाई दुबे, शिलाबाई नरवडे, अंबादास कांबळे, माणिक राठोडसह विजय फासाटे, माजी सरपंच अशोक धर्मे, युवा सेना तालुका प्रमुख विकास गोर्डे, माजी चेअरमन अंबादास गवारे, रावसाहेब हाडे तसेच आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.