अहिल्यानगर
जॉय इंग्लिश स्कुल मध्ये रक्षाबंधन उत्साहात
श्रीरामपुर | बाबासाहेब चेडे : सौ. स्मिता नंदकिशोर निर्मळ बहु उद्धेशिय संस्थेचे जॉय इंग्लिश मिडीयम स्कूल येथे 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाळासाहेब कोकरे पाटील हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनोद शेळके हे उपस्थित होते. सर्व मुलांनी चांगल्या प्रकारे आजच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून प्रोत्साहन दिले. आजचा कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने पार पाडल्याबद्दल जॉय इंग्लिश मीडियम शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर निर्मळ, सखाराम निर्मळ यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच शाळेचे सर्व शिक्षक सौ. खान, सौ. शेख, सौ. ब्राह्मणे, सौ. शीतल, सौ. पठाण, सौ. यादव यांनी कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी सहकार्य केले.