सामाजिक

झाडे लावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ती जगविणे – अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर

तांभेरे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण

राहुरी | मधुकर म्हसे : प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रमात वृक्ष लागवड केली जाते, परंतु ती झाडे लावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ती जगविणे महत्वाचे आहे. वृक्षारोपण सारखे सामाजिक उपक्रम राबविल्यानंतर त्या वृक्षांचे संवर्धनही केले पाहिजे असे प्रतिपादन श्रीरामपूर चे पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी केले आहे.
तांभेरे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १००० वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना श्रीमती स्वाती भोर म्हणाल्या की, मी पुढील वर्षी पुन्हा वृक्षारोपण करण्यासाठी येणार आहे. वृक्षांपासुन खुप फायदे आहेत. मी वनस्पती शास्त्र विषयात पदवी घेतली असल्याने वृक्ष लागवडी बरोबर संवर्धनाची मला आवड आहे. आता या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी येथील ग्रामस्थांची आहे. 
या कार्यक्रमाप्रसंगी गावातील तरुण शेतकर्यांनी ट्रक्टरला देशाचा तिरंगा लावुन रॅली काढली. वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेशराव वाबळे, जगताप कंस्ट्रक्शन कंपनीचे दिलीपराव जगताप व राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी दहा फुटांपर्यंत वाढलेल्या वृक्षांची मान्यवरांच्या हस्ते लागवड करण्यात आली. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर ताराचंद गागरे यांनी केले तर आभार डॉ. सुधाकर मुसमाडे यांनी मानले.

व्हिडिओ पहाझाडे लावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ती जगविणे – अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर


या कार्यक्रमास श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक खाडे, राहुरी पोलीस उपनिरीक्षक खोंडे, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेशराव वाबळे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार, माऊली शेळके, ग्रामसेवक राजेंद्र मेहेत्रे, किशोर गागरे, सरपंच डॉ सुधाकर मुसमाडे, विनोद मुसमाडे, उपसरपंच सागर मुसमाडे, डॉ. उमेश मुसमाडे, सुनील शेलार, नितीन गागरे, रमेश गागरे, मेजर ताराचंद गागरे, सुनील गागरे, विलास मुसमाडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक मुसमाडे, यात्रा कमिटी सचिव चंद्रकांत पवार, श्रीराम यात्रा कमिटी अध्यक्ष बाळासाहेब मुसमाडे, लक्ष्मण गागरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button