अहमदनगर
उंदिरगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील उंदीरगाव ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न झाला. लोकनियुक्त सरपंच सुभाष बोधक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्याचप्रमाणे सर्कल नंबर सहा येथे प्रा.सोपानराव नाईक, उपसरपंच रमेश गायके यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माजी सदस्य मंगलताई पवार यांच्या हस्ते, भास्करराव पा गलांडे शाळेत दादासाहेब खर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब नाईक, जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्र पाऊलबुदे, राजेंद्र गिऱ्हे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन भाऊसाहेब बांद्रे, रेवजी भालदंड, सोसायटी चेअरमन प्रमोद भांलदंड, दिलीपराव गलांडे, आरोग्य मित्र भीमराज बागुल, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ताके, दीपक बोधक, छगन धिवर, अमोलभाऊ नाईक, गोकुळ भालदंड, ग्रामविकास अधिकारी शरद वावीकर, कामगार तलाठी हेमंत डहाळे, डॉ.सुनील राजगुरू, वारुळे पंडित जगधने, मनोजभाऊ बोडके, किशोर नाईक, सुनील आव्हाड, सुभाषराव शिंदे, दिलीप मोरे, आशा वर्कर प्रतिभा वाघमारे, गायकवाड अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य केंद्र सर्व स्टाफ ग्रामस्थ शाळेचे शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य व सर्व स्टाफ सोसायटी संचालक, विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व भाषणे झाली. यावेळी शाळेतील मुलांना ग्रामपंचायत कडून खाऊचे वाटप करण्यात आले.