अहिल्यानगर
छत्रपती शिवाजी महाराज सहकारी खरेदी विक्री संघ येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
श्रीगोंदा | सुभाष दरेकर
: छत्रपती शिवाजी महाराज सहकारी खरेदी विक्री संघ येथे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू, सुवर्ण पदक विजेती जोगेश्वरी पुरस्काराची मानकरी पै.धनश्री हनुमंत फंड या विद्यार्थीनीच्या हस्ते करण्यात आले.यावेळी चेअरमन संभाजी घुटे, संचालक नंदकुमार ताडे, अभिजित जगताप, रंगनाथजी दारकुंडे, प्रा.सचिन डफळ, राजेंद्र शिंदे, सुनील दरेकर, प्रविण दारकुंडे यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात चेअरमन घुटे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, प्रोत्साहन मिळावे, मुलींना कला, क्रिडा क्षेत्रात वाव मिळावा या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.