अहमदनगर

छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत छावा क्रांतिवीर सेनेचे राष्ट्रीय महाधिवेशन

संगमनेर शहर : छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे ८ वे राष्ट्रीय महाअधिवेशन पैठण येथे २० ऑगस्ट रोजी खा. युवराज छत्रपती संभाजी महाराज भोसले, महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, मंत्री संदिपान भुमरे, करण गायकर (संस्थापक / अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना तथा स्वराज्य संघटना प्रवक्ते) विशेष अतिथी म्हणून अर्जुन खोतकर, अभिजीत राणे यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती छावाचे अनिल राऊत यांनी दिली.
या अधिवेशनात डॉ. आयुषी देशमुख (राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या धर्मपत्नी) यांच्यासह सर्वपक्षीय नेते, सर्व बहुजन सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष व पदाधिकारी सर्व सन्माननिय जिल्हापरिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच ग्रा.पं. सदस्य पैठण आदी उपस्थित राहणार आहे.
या अधिवेशनातील प्रमुख मागण्यांमध्ये मराठा आरक्षण, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह, विभागनिहाय आणि जिल्हानिहाय सारथीचे कार्यालय स्थापन करण्यात यावे, सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास १००० कोटी निधीची तरतुद करण्यात यावी, मराठा आरक्षणावर स्थगिती आल्याने एस.ई.बी.सी. तील सुविधा उपलब्ध व्हावी व यातून नियुक्त मराठा उमेदवाराची नियुक्ती प्रक्रिया रखडली ती त्वरीत राबविण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी व शेतीमालाला हमी भाव, शेतकऱ्यांच्या शेती पंपास मोफत विज पुरवठा करण्यात यावा, कृषी कार्यालय पैठण शहरात स्थलांतरीत करण्यात या मागण्या या अधिवेशनातून करण्यात येणार आहेत. हे अधिवेशन अभिनंदन मंगल कार्यालय, पैठण येथे शनिवार दि.२० ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वा होणार असुन संगमनेर तालुक्यातील युवक, महिला मोठ्या संख्यने जाणार असल्याची माहिती माहिती अहमदनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे यांनी दिली.
यावेळी संगमनेर तालुकाध्यक्ष गणेश थोरात, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष संदिप राऊत, तालुका उपाध्यक्ष सचिन गांजवे, कलाकार आघाडी तालुकाध्यक्ष भागवत कानवडे, तालुका संपर्क प्रमुख गणेश फरगडे, वि.आघाडी तालुकाध्यक्ष लक्ष्मण सातपुते, शहरध्यक्ष मनोहर जाधव, शेतकरी शे.आघाडी तालुकाध्यक्ष नवनाथ राऊत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजश्रीताई वाकचौरे, शे.आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र डुबे, आशिष गवळी, निमगाव शाखा प्रमुख सचिन कानवडे, दत्ता शेटे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button