अहिल्यानगर
आधारवेलचा अपघात विमा उपक्रम कौतुकास्पद – तहसीलदार शेख
आधारवेल फाउंडेशन विमा पॉलिसी वितरण करताना तहसीलदार फसियोद्दीन शेख,पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ,संस्थापक अध्यक्षा वैशालीताई नान्नोर,प्रा.जितेंद्र मेटकर आदी मान्यवर…
राहुरी (प्रतिनिधी) : धकाधकीच्या काळात रस्त्यावर भरधाव वेगाने वाहणाऱ्या वाहनांमुळे अनेक अपघात होतात.मृत्युचे वाढते प्रमाण लक्षात घेता आधारवेल फाऊंडेशनचा अपघात विमा पॉलिसी उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी काढले.
राहुरी येथे संत गाडगे महाराज आश्रम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या आधारवेलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने तहसीलदार फसियोद्दीन शेख बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.जितेंद्र मेटकर हे होते.पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ,आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस,काँग्रेस नेते अमृत धुमाळ या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबासाहेब धोंडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ दीपाली गायकवाड,डिग्रस सोसायटीचे चेअरमन प्रकाश तारडे,पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर,शेतकरी संघटनेचे सुरेश लांबे,विमा प्रतिनिधी रहेमान शेख आदींनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी ज्ञानदेव क्षीरसागर,दत्तात्रय लेंभे,ज्ञानदेव भिंगारदे,बापूसाहेब पटारे,लहानू तमनर,पोपट शिंदे,निलेश पंडित,भारत मतकर, आप्पासाहेब सरोदे,दत्तात्रय खेडेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आधारवेल फाउंडेशन ही गोरगरिबांना मदतीचा व आधार देणारी संस्था असून यापुढे देखील हे सामाजिक कार्य असेच कायम चालू राहणार असुन या माध्यमातून गरजूंना विविध शासकीय योजनांचा लाभ, अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य वाटप,निराधार विधवा महिलांना आधार महिला सक्षमीकरण,आत्महत्याग्रस्त व कर्जबाजारी शेतकरी कुटुंबाना मोफत शेतीपयोगी कृषी साधने वाटप, कोरोना काळात गोरगरीब लोकांना मोफत किराणा वाटप, आशा सेविकांना, प्रशासनाला व पत्रकारांना मोफत कोरोना संरक्षण किट वाटप असे अनेक विविध सामाजिक उपक्रम आधारवेलने आजपर्यंत राबविलेले आहेत.”
सौ.वैशालीताई नान्नोर
संस्थापक अध्यक्षा,आधरवेल फाउंडेशन