अहिल्यानगर

तालुक्यातील सर्व निवडणुका स्वबळावर निवडणूक लढविणार- बबनराव घोलप

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : नगर जिल्ह्यात प्रस्थापिताविरुद्ध क्रांती घडविणार असून तालुक्यातील नगरपालिकासह सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समोर प्रस्ताव ठेवून आपण सर्वांनी महाविकास आघाडी न करता जिल्हा माझ्यासाठी सोडावा अशी विनंती आपण करणार आहोत व त्याला सर्वांनी सहकार्य करावे असे मनोगत माजी मंत्री बबनराव घोलप यांनी इंदिरानगर श्रीरामपूर येथे गणेशराव बोरुडे यांच्या निवासस्थानी झालेल्या सदिच्छा भेटील व्यक्त केले. गणेशराव बोरुडे यांनी मित्रमंडळाच्या वतीने घोलप यांचा सत्कार केला. ते म्हणाले नासिक जिल्ह्यात काही नसताना आमदार व मंत्री झालो. अशाच प्रकारे नगर जिल्हा पिंजून काढणार असल्याचे सांगितले.
यावेळी गणेश बोरुडे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, अंकुश जेधे, गोरख जेधे, सुनील म्हस्के, गणेश गवारे, आकाश मैड, प्रसाद जेधे, प्रसाद थोरात, बंडू भोसले, निखील गांगुर्डे, आदित्य चौधरी, माउली म्हस्के, अजय गांगुर्डे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button