महाराष्ट्र
महाराष्ट्र समाजभुषण पुरस्कार सरपंच संघटीत चळवळीचे प्रणेते पावसे यांना जाहीर
संगमनेर/ बाळासाहेब भोर : कुसुमवत्सल्य फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार संगमनेर तालुक्यातील युवा नेतृत्व सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या कुसुमवत्सल्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशालीताई पाटील यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे दि १३ ऑगस्ट २०२१ रोजी माजी सेवानिवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ विठ्ठल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ समाजिक कार्यकर्ते शिरीष मोहीते, जेष्ठ विचारवंत लेखक दत्ता कोहीणकर, नगरसेविका सौ राजश्री नवले यांच्या हस्ते स्वप्निल जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. श्री पावसे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.